Wakad : डीपीला लागलेल्या आगीत व्यक्तीचा गंभीररीत्या भाजल्याने मृत्यू

एमपीसी न्यूज – डीपीला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा गंभीररित्या जळून मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) दुपारी पावणे एकच्या सुमारास डांगे चौकाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी पावणे एकच्या सुमारास डांगे चौकाजवळ बीआरटी रोडमध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. याबाबतची माहिती पुणे अग्निशमन विभागास मिळाली. पुणे अग्निशमन विभागाने ही माहिती तात्काळ रहाटणी अग्निशमन विभागाला कळवली. दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी देखील रहाटणी अग्निशमन विभागाला माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार रहाटणी अग्निशमन विभागाचे लिडिंग फायरमन संतोष सरोटे, फायरमन विजय घुगे, भूषण येवले, विशाल पोटे आणि वाहन चालक राजाराम लांडगे यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

बीआरटी मार्गावर असलेल्या डीपीला आग लागलेली दिसली. त्यामुळे तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. विद्युत विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याची खात्री झाल्यानंतर आग विझवण्यात आली. दरम्यान, डीपीमध्ये एक व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे. त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून आगीचे नेमके कारण देखील समजू शकले नाही. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.