Wakad Fire News : ‘एमएनजीएल’ची पाईपलाईन फुटून लागली आग

एमपीसी न्यूज – पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरू असताना ‘एमएनजीएल’ची पाईप फुटली. यामुळे पाईप मधून गळती झालेल्या गॅसने पेट घेतला. गॅस पसरलेल्या भागात आग पसरत होती. मात्र, तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दत्तमंदिर, वाकड याठिकाणी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हि घटना घडली. 

रहाटणी अग्निशमन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, दत्तमंदिर, वाकड याठिकाणी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू होते. त्यावेळी शेजारीच असलेल्या ‘एमएनजीएल’ची पाईपलाईन फुटली. यामुळे गॅस गळती होऊन आग लागली. आग पसरत असताना जेसीबीच्या साहाय्याने त्यावर माती टाकण्यात आली.

याबाबत वर्दी मिळताच रहाटणी अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित भागाचे कुलिंग केले. यानंतर ‘एमएनजीएल’चे कर्मचारी दाखल झाले व गॅस गळती बंद केली. अचानक लागलेल्या आगीमुळे काही काळ परिसरात नागरिकांची धांदल उडाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.