Pune : कसबा पेठेतील महाजन वाड्याला आग

एमपीसी न्यूज – कसबा पेठ येथील एका तीन मजली(Pune) जुन्या महाजन वाड्याला आग लागल्याची घटना आज (सोमवारी) पहाटे चार वाजता घडली. वाडा हा बंदीस्त असल्याने यात कोणीही जखमी झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 6 वाहने(Pune) घटनास्थळी दाखल झाली होती. वाड्यात लाकडी बांधकाम असल्याने आगीच्या मोठ्या ज्वाळा अठत होत्या. काही काळ परिसरात परिसरात धुराचे लोट पसरले होते.

Chinchwad : तळवडे आग दुर्घटना; मृत महिलांचे डीएनए चाचणी अहवाल प्राप्त, सहा महिलांवर एकाच वेळी होणार अंत्यसंस्कार

जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग पुर्णपणे नियंत्रणात आणली. वाडा हा बंद स्थितीत असून तेथे वास्तव्यास तेथे कोणी नव्हते त्यामुळे यात कोणी जखमी झाले नाही. मात्र वाडा यात जळून खाक झाला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.