Pune : लोणावळा -पुणे लोकलच्या वाढीव फेऱ्यांचा मागणीसाठी मनसेचं आंदोलन

एमपीसी न्यूज -लोणावळा इथे लांब पल्याच्या रेल्वे गाड्या (Pune)आणि पुणे -लोणावळा लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी या मागण्या घेऊन मनसेकडून लोणावळा रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलन करण्यात आलं. मनसे कार्यकर्त्यांनी काही वेळ रुळावर उतरून डेक्कन क्वीन रोखली होती . मनसे कार्यकर्त्यांना बाजूला करतांना पोलिसांची यावेळी दमछाक झाली होती .

मावळ,पिंपरी,चिंचवड शहरातील हजारो जण (Pune)दररोज लोणावळ्यात कामासाठी जात असतात. लोणावळा हे पर्यटन क्षेत्र आहे त्यामुळे अनेक पर्यटक रेल्वेने लोणावळ्यात येतात. विद्यार्थी देखील लोकलचा वापर करतात .

लोकलच्या फेऱ्या कमी असल्यामुळे त्यांना लोकलची वाट बघत स्टेशन वर थांबावं लागत आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे सुध्दा लोणावळ्यात थांबत नाहीत. सकाळी दहा नंतर दुपारी तीन वाजता लोणावळा -पुणे लोकल आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे .

BJP : आमदार उमा खापरे यांची पिंपरी विधानसभा प्रभारी पदी नियुक्ती

या मागणीसाठी मनसे कडून रेलरोको आंदोलन करण्यात आल. स्टेशन मास्तरला माणसे कार्यकत्यांनी स्मरणपत्र दिल.या आंदोलनाची दखल न घेतल्यास लोणावळा स्टेशन वरून रेल्वे पुढे जाऊ न देण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.