BJP: शालेय पोषण आहार योजनेत अंड्याचा समावेशाला भाजप आध्यात्मिक आघाडीचा विरोध

एमपीसी न्यूज – शासनाने एक परिपत्रक काढले आहे. यानुसार(BJP) ‘पंतप्रधान पोषण आहार योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंड्यांचा समावेश केला आहे.

 

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, महानुभव संप्रदाय, जैन संप्रदाय, तसेच विविध आध्यात्मिक संप्रदायांचे भाविक दु:खी झाले आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला भाजप आध्यात्मिक आघाडीचा विरोध आहे.

Pune : कसबा पेठेतील महाजन वाड्याला आग

या संदर्भात आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा (BJP)निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती ‘भाजप आध्यात्मिक आघाडी’चे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी शनिवारी (दि.9) ‘फ्रुटवाले धर्मशाळा’ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी आध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. संजयनाना धोंगडे, कोकण विभाग संयोजक ह.भ.प. मोहन महाराज म्हात्रे, पश्‍चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज घुंडरे, ‘फ्रुटवाले’ धर्मशाळेचे अध्यक्ष भगवानशेठ थोरात, व्यवस्थापकीय विश्‍वस्त रंजनशेठ जाधव, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य राम गावडे, हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट, आळंदी युवा मोर्चाचे श्री. आकाश जोशी आदी उपस्थित होते.

आचार्य तुषार भोसले पुढे म्हणाले, ‘‘गंगा नदी शुद्ध करण्यासाठी ज्याप्रकारे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचप्रकारे आळंदी येथील इंद्रायणी आणि पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेसाठी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यासाठी ‘अमृत 2.0 योजना संमत’ करण्यात आली आहे. यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने 550 कोटी आणि आळंदी नगरपालिकेच्या वतीने 80 कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. या योजनेस राज्यशासनाने संमती दिली असून लवकरच केंद्रशासनाचीही संमती मिळेल. यानंतर नदी स्वच्छतेचे काम तात्काळ चालू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी सुनील घनवट म्हणाले की, ‘‘आपण जो पदार्थ खातो त्याचा संस्कार मनावर होत असल्याने विद्यार्थ्यांना आहारात सात्त्विक पदार्थ देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याचा पुनर्विचार करून सात्त्विक आहाराचा समावेश त्यात करावा, असेही त्यांनी सुचवले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.