Maharashtra Corona Update : राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांच्या उंबरठ्यावर ; आज 27,126 हजार नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात दररोज विक्रमी कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. राज्यात आज, शनिवारी दिवसभरात 27,129 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 24 लाख 49 हजार 147 एवढी झाली आहे. त्यापैकी 22 लाख 03 हजार 553 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात 13 हजार 588 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात  1 लाख 91 हजार 6 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात 92 रुग्णांचा मृत्यू झाला. आजवर 53 हजार 300 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.18 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.97 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात सध्या 9 लाख 18 हजार 408 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 7 हजार 953 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक 38 हजार 803 सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्यानंतर नागपूर मध्ये 28 हजार 423, मुंबईत 20 हजार, ठाण्यात 18 हजार 088 आणि नाशिक व औरंगाबाद मध्ये 13 हजार सक्रिय रुग्ण आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.