Wakad : वाकडहून गोव्याला निघालेले घरसामान 19 दिवसानंतरही घरी पोहोचलेच नाही; कार्गो मूव्हर्स कंपनीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – वाकड येथून 19 ऑक्टोबर रोजी गोव्याला सामान शिफ्ट करण्यासाठी एका कार्गो कंपनीला काम दिले. मात्र, कंपनीने अद्याप सामान दिलेल्या पत्त्यावर न पोहोचवता त्याचा अपहार केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

सुरेश आत्माराम अरोलकर (वय 68, रा. थ्री विन, बारडेझ, गोवा) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, एक्सपर्ट अग्रवाल कार्गो मोव्हर्सचे मालक व कर्मचारी रतनलाल, राजेश भांबू, रजत कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश यांचा मुलगा सुनील वाकड येथील एव्हिरा सोसायटी, पार्क स्ट्रीट येथे राहतात. त्यांचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे घरसामान गोव्यातील घरी शिफ्ट करायचे होते. त्यासाठी त्यांनी सामान गोव्याला पोहोचवण्याचे काम एक्सपर्ट अग्रवाल कार्गो मोव्हर्स या कंपनीला 19 ऑक्टोबर रोजी दिले.

काम दिल्यानंतर कंपनीचे कर्मचारी येऊन सामान घेऊन गेले. मात्र, 19 दिवस उलटले तरी अद्याप सामान गोव्यातील घरी पोहोचले नसल्याने कार्गो कंपनी विरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.