Wakad : थेरगावात तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – दुचाकीवरील चोरटयांनी पादचारी तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. ही घटना 24 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

या प्रकरणी पवनकुमार नेमगौडा पाटील (के 29, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील तीन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील डांगे चौक येथून पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरटयांनी त्यांच्या हातातील 11 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.