Pimpri : पिंपरी चिंचवड शहर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सुनील कडुसकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अडव्होकेट्‌स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सुनील कडुसकर यांची तर उपाध्यक्षपदी अॅड. योगेश थंबा यांची बुधवारी (ता. 31) निवड करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड अडव्होकेटस बार असोसिएशनच्या एक हजार एकशे एकतीस सभासदांपैकी नऊशे आठ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी अॅड. सुनील कडूसकर व अॅड. मनोज अगरवाल यांच्यात लढत झाली. उपाध्यक्षपदी अॅड. योगेश थंबा 444 मते पडली. सचिवपदी अॅड.. गोरख कुंभार यांना 517 मते पडली.

_MPC_DIR_MPU_II

हिशोब तपासणीस अॅड. महेश टेमगिरे यांची बिनविरोध निवड झाली. सहसचिवपदी अॅड. अकुंश गोयल यांना 451 मते पडली. खजिनदारपदासाठी अॅड. संतोष मोरे यांना 532 मते पडली. तर अॅड. पूनम राऊत, अॅड. सुनील रानवडे, अॅड. रामचंद्र बो-हाटे, अॅड. विजय बाबर, अॅड. निलेश ठोकर, अॅड. केशव घोगरे यांची सदस्यपदी निवड झाली.

मुख्य निवडणूक कार्यकारी समिती म्हणून अॅड. सुहास पडवळ, अॅड. संदीप चिंचवडे, अॅड. देवराम ढाळे, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. उत्तम चिखले, अॅड. अनिल तेजवानी, अॅड. विजय शिंदे, अॅड. रघुनाथ सोनवणे, अॅड. सुशील मंचरकर, अॅड. विलास कुटे यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.