Pimpri : वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनकडून निषेध

एमपीसी न्यूज – राहुरी येथील वकील दांपत्य 25 जानेवारी (Pimpri) पासून बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचे अपहरण आणि हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने देखील घटनेचा निषेध करण्यात आला.

यावेळी महिला अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, सचिव ॲड. अक्षय केदार, ॲड. ऑडिटर ॲड. संतोषी काळभोर, सदस्य ॲड. जयेश वाघचौरे, ॲड. तेजस चवरे, ॲड. विशाल पौळ, ॲड. साक्षी धुमाळ, ॲड. गीतवली जाधव, ॲड. निलम जाधव, तसेच ॲड. प्रविण जाधव, ॲड. सागर पोवार, ॲड. रोहीत भोसले, ॲड. विनोद आढाव आदी उपस्थित होते.

Pimpri : रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेसाठी मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावे – अमित गोरखे

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकीली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दाम्पत्य गुरुवारी (दि. 25) पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला असता दांपत्याची (Pimpri) हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ही अतिशय निंदनीय बाब असल्याने याचा निषेध म्हणून सोमवारी (दि. 29) पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयातील बार रूममध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.

निषेध सभेत या घटनेचा उपस्थित वकील बांधवांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, ॲड. सुनील कडुस्कर, ॲड. मामा खरात, ॲड. बी. के. कांबळे, ॲड. गजेन्द्र तायडे, ॲड. योगेश थांबा, ॲड. संगिता कुशाळकर, ॲड. सविता तोडकर, ॲड. पुनम शर्मा, ॲड. संगिता तोडकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. काका काळभोर, ॲड. लाळगे पाटील आदींनी निषेध व्यक्त केला. तसेच सर्व वकील बांधवांच्या वतीने वकील दाम्पत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अपहरण आणि हत्या खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा पारित करावा, अशी मागणी यावेळी वकील बांधवांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.