Sangvi : मुलीला मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – मुलीला जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तीस वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नेताजी विश्वनाथ सूर्यवंशी (वय 28, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला चिंचवड येथे एका खासगी ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी येत असताना आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर वेळोवेळी पीडित महिलेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.