Sangvi : हरवलेल्या चिमुकल्या दामिनी पथकामुळे परतल्या घरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील (Sangvi) सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दामिनी पथकाने चांगली कामगिरी केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मुलींच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या सुखरूपपणे स्वाधीन करण्यात आले.

सोनाली जगताप, हिरकणी भोये, प्रियांका गुजर, स्वप्नाली शिंदे, अश्विनी उबाळे या दामिनी पथकाने ही कामगिरी केली आहे.

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजमाता जिजाऊ गार्डन येथे अनुक्रमे आठ आणि चार वर्षीय दोन चिमुकल्या हरवल्या असल्याचे दामिनी पथकाच्या निदर्शनास आले. महिला अंमलदारांनी मुलींना ताब्यात घेऊन त्यांची मायेने विचारपूस केली. त्यानंतर मुलींकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांच्याबद्दल सोशल मिडीयावर एक पोस्ट प्रसारित केली.

Pune : पुणे ड्रग्ज प्रकरणी अमित ठाकरे अ‍ॅक्टिव्ह मोडवर; कुलगुरू, पोलिसांसोबत साधला संवाद,वैयक्तिक जनजागृती करणार

काही वेळाने मुलीच्या पालकांनी सांगवी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत त्यांची पडताळणी केली. त्यानंतर मुलींना पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. मुली हरवल्यामुळे घाबरलेले पालक मुलींना सुखरूप पाहून गहिवरले.

सांगवी (Sangvi) पोलिसांच्या दामिनी पथकाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देखील कौतुक केले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या कामगिरीबाबत आपल्या X अकाउंटवरून सांगवी दामिनी पथकाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.