Indori : प्रसादाच्या बहाण्याने नागरिकाची सोन्याची चैन केली लंपास

एमपीसी न्यूज – प्रसादाच्या बहाण्याने दोन (Indori) अनोळखी इसमांनी एका 58 वर्षीय नागरिकाकडून सोन साखळी हातचालाखीने लंपास केली आहे. हि घटना गुरुवारी (दि.22) इंदोरी, ज्योतीबा मंदिराजवळ घडली.

याप्रकरणी नारायण मारुती चव्हाण (वय 58 रा. इंदोरी) यांनी गुरुवारी फिर्याद दिली आहे. यावरून दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

Sangvi : हरवलेल्या चिमुकल्या दामिनी पथकामुळे परतल्या घरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादीला प्रसादाचा बहाणा करून एका लहान पिशवीमध्ये 5 बिस्कीट पुडे, 1 हजार 200 रुपये ठेवायला लावले. पुढे प्रसाद पावन करण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या गळ्यातील (Indori) 50 हजार रुपयांची 20 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन ठेवायला लावली.

हात चालाखीने चैन लंपास केली. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.