Wakad News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तरुणाचा मोबाईल हिसकावला; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले आणि जबरदस्तीने तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. ही घटना 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास डांगे चौक येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

ओमकार उर्फ नाट्या अविनाश भुतेकर (वय 21 रा. चऱ्होली फाटा), प्रविण उर्फ सुब्र्या यशवंत असवले (वय 22, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) आणि लालसिंग रोहित्या दानसिंग सोनार (वय 21, रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. माणिक विठ्ठल शिंदे (वय 21, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी माणिक शिंदे हे डांगे चौक येथून पायी जात होते. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांना थांबविले. त्यानंतर त्यांच्या खिशातील पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला आणि शिवीगाळ करून चोरटे पळून गेले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.