Wakad : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर लग्न केले नाही. हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते मे 2018 या कालावधीत मंगलनगर थेरगाव येथे घडला . याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार परशुराम लक्ष्मण मोगल (वय 26, रा. तळोदा, रांजनी, नंदुरबार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे अमिश दाखवले. त्याचा गैरफायदा घेत त्याने नोव्हेंबर 2017 ते मे 2018 या कालावधीत तरुणीशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. मात्र लग्न केले नाही. यावरून तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन बुधवारी (दि. 2) गुन्हा नोंदवला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.