Pune News : कामगारांच्या न्यायासाठी भारतीय मजदूर संघाचा अधिवेशनात तीव्र आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा भारतीय मजदूर संघाचे अधिवेशन विश्वकर्मा भवन, पुणे येथे शनिवारी (दि.19) पार पडले. असंघटित, कंत्राटी कामगारांना रोजगार सुरक्षितता, जीवन वेतन, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय व पेंशन आदी बाबी लागू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. याची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन येणूरे यांनी दिला.

यावेळी संघटनमंत्री श्रीपाद कुटासकर, अश्विनी देव, जालिंदर कांबळे, हरि सोवनी, अजेंद्र जोशी उपस्थित होते.

अधिवेशनात नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाध्यक्षपदी अर्जुन चव्हाण, सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ , कार्याध्यक्ष अभय वर्तक, अजेंद्र जोशी, संघटन मंत्री हरी सोवनी, सहसंघटन मंत्री उमेश विस्वाद व कार्यालय व्यवस्था प्रमुख विवेक ठकार यांची निवड करण्यात आली.

प्रवीण निगडे (राज्य सरकारी कर्मचारी), बाळासाहेब पाटील महिंद्रा (सी आय ई), अण्णा महाजन (सेंचुरी ऐन्का), सुरेश जाधव (महावितरण), उमेश आणेराव (विज कंत्राटी), बाळासाहेब वरपे (खाजगी ऊद्योग) यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर सहसचिव म्हणून ज्ञानेश्वर पाटील (ॲम्युनेशन खडकी), विजयेंद्र सावंत (ईस्पेस हायवे), विजय बुधकर (शैक्षणिक), बालाजी ढेरंगे (पोस्ट), दत्तात्रय जाधव (गोदरेज ॲन्ड बाॅईज), संतोष शितोळे (कारगील इंडिया कुरकुंभ), विजय चव्हाण (बांधकाम कामगार संघ), राहूल बोडके (विज कंत्राटी) यांची निवड करण्यात आली.

वंदना कामठे (टेलिफोन) व भागश्री बोरकर यांची महिला विभाग प्रमुख म्हणून निवड करण्यात आली तसेच, सचिन मेंगाळे यांची प्रसिद्ध प्रमुख म्हणून व सहप्रसिध्दी प्रमुखपदी गणेश टिंगरे यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून सचिन मेंगाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.