Pimpri : कॉंग्रेसच्या वतीने पं. नेहरु आणि लव्हुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज –  देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी नेहरुनगर येथील पं. नेहरु यांच्या पुतळ्यास आणि आद्य क्रांतीगुरु वीर लव्हुजी वस्ताद साळवे यांना आदरांजली वाहण्यात आली. चिंचवड स्टेशन येथील लव्हुजी वस्ताद यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी महापौर कविचंद भाट आणि संग्राम तावडे, नरेंद्र बनसोडे, मकरध्वज यादव,  मयूर जयस्वाल, लक्ष्मण रुपनर, शहाबुद्दीन शेख, तारीक रिझवी, सुंदर कांबळे, अनिरुध्द कांबळे, विशाल कसबे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.