Weather Report : पुणे व मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज – पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. 

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा : भिरा, मुरुड 2, रोहा 1

मध्य महाराष्ट्र : अकोले, कोपरगाव, पाथर्डी, पुणे (लोहगांव), येवला 6 प्रत्येकी, जामखेड, ओझर (नाशिक) 5, शिरपूर 4, चाळीसगाव, चांदवड, इगतपुरी, खेड राजगुरूनगर, माळशिरस, निफाड, पुरंदर सासवड, शेवगाव 3 प्रत्येकी, बारामती, चोपडा, देवला, जाट, राहुरी, संगमनेर, शिरूर घोडनाडी, श्रीरामपूर, सिन्नर 2 प्रत्येकी, जेऊर, करमाला, कोरेगाव, माढा, मंगलवेढा, ओझरखेडा, पाचोरा, पौड मुळशी, राहाता, यावल 1 प्रत्येकी.

मराठवाडा: भीम 6, वैजापूर 2, औरंगाबाद, बदनापूर, जाफराबाद, कैज, पाटोदा, शिरूर कासार 1 प्रत्येकी.

विदर्भ: नांदगाव काजी, रिसोड, सिंधखेडराजा 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज:

20 ऑक्टोबर: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

21 ऑक्टोबर: कोकण गोव्यात बहुतांश, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

22 ऑक्टोबर: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

23 ऑक्टोबर: कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

इशारा:

19-20 ऑक्टोबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

21 ऑक्टोबर : दक्षिण कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

22 ऑक्टोबर : दक्षिण कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता.

23 ऑक्टोबर : दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. दक्षिण महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.