Pimpri crime News : डॉक्टर तरुणावर वार; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने जात असताना समोरून येणा-या दुचाकीला हाताने इशारा करून बाजूला होण्यास सांगितले. यावरून दुचाकीवरील दोघांनी विरुद्ध दिशेने जाणा-या डॉक्टर तरुणावर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना 15 ऑक्टोबरला दुपारी सव्वा चार वाजता यशवंतनगर, पिंपरी येथे घडली.

डॉ. प्रवीण रुद्रय्या मठ (वय 29, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नवा आहे. याबाबत त्यांनी रविवारी (दि. 18) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय बाबासाहेब पौळ (रा. विठ्ठल नगर, पिंपरी), आप्पा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 15) दुपारी सव्वा चार वाजता फिर्यादी मठ यशवंतनगर पिंपरी येथून दुचाकीवरून विरुद्ध दिशेने जात होते. त्यावेळी समोरून एका दुचाकीवरून आरोपी येत होते. त्या दुचाकीला इशारा करून बाजूला होण्यास फिर्यादी यांनी सांगितले.

यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत भांडणे केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये येऊन ‘बाहेरून येऊन दादागिरी करतो काय’ असे म्हणून फिर्यादी यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.