Cold Wave : उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्रही गारठला

एमपीसी न्यूज – सध्या उत्तर भारतात थंडीचा कडाका (Cold Wave) चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही तापमापकातील पारा चांगलाच घसरला आहे. राजधानी दिल्लीत आज (रविवारी) सकाळी 5.4 अंश सेल्सियस इतक्या तर पुण्यात 11.6 अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. 

राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीचा (Cold Wave) जोर कायम राहणार आहे. तसेच धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. रविवारी सकाळी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे पाहायला मिळाले.

Tunisha Sharma : उदयोन्मुख अभिनेत्री तुनिषा शर्माची ‘सेट’वरच आत्महत्या; अभिनेता शिजान खानला अटक

भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस पंजाब हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागात थंडीची लाट (Cold Wave) येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुणे शहर व परिसरात किमान तापमान 10 अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरेल तसेच सकाळी धुके पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. सोमवारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहून किमान तापमानात किंचित वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सोमवार ते बुधवार किमान तापमान 12-13 अंशाच्या तर गुरुवारी त्यात आणखी वाढ होऊन ते 14 अंश सेल्सियसच्या आसपास राहील, असे पुणे वेधशाळेच्या दैनंदिन हवामान वार्तापत्रात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.