Maharashtra : पुढील तीन दिवस थंडीचे ; किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज

PCMC School : महापालिका शाळेतील 19 विद्यार्थी भारत दर्शनसाठी रवाना
सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवेल. राज्यात 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल.
दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे.
राज्यात रविवारी सर्वांत कमी 14 अंश सेल्सिअस तापमान जळगावात नोंदवले गेले, तर रत्नागिरीत सर्वाधिक 35.6 अंश सेल्सिअस (Maharashtra) तापमान होते.