Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज – येत्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडला. कोंकण-गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बऱ्याच ठिकाणी तर कोंकण-गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) खालीलप्रमाणे

मुंबई (कुलाबा) 25.0, सांताक्रूझ 23.4, अलिबाग -रत्नागिरी 23.5, पुणे 18.8, कोल्हापूर 21.1, नाशिक 18.3, सांगली 20.4, सातारा 19.8, औरंगाबाद 17.4, परभणी 16, अमरावती 15.8, नागपूर 17.2, वाशिम 15.6

राज्यात सर्वात कमी किमान तापमान वाशिम येथे 15.6 से. नोंदवले गेले.

पुढील हवामानाचा अंदाज 

02-06 नोव्हेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता.

इशारा 

02-06 नोव्हेंबर – काही नाही

पुणे व मुंबई येथे आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.