Pune News : भाजपच्या पदवीधर मतदार नावनोंदणी महाअभियानाला पुरंदर व दौंड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज – भाजपच्या वतीने पदवीधर मतदार नावनोंदणी महाअभियानाला पुरंदर आणि दौंड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी प्रमुख रवींद्र भेगडे यांनी त्यांच्या पुणे जिल्हा ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याची सुरूवात पुरंदर तालुक्यातील सासवड येथून केली.

त्यावेळी जिल्हा भाजपा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, भाजपचे तालुकाध्यक्ष आर.एन.जगताप,सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप, तसेच निलेश जगताप, श्रीकांत थिटे, श्रीकांत ताम्हणे, गणेश भोसले, आबासाहेब राऊत, सचिन पेशवे, संजय चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जास्तीतजास्त सर्वसामान्य पदवीधर मतदार नावनोंदणी करून घेण्यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा.पदवीधर निवडणुकीविषयी लोकांमध्ये माहिती पोहोचवण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन भेगडे यांनी यावेळी केले.

भेगडे यांनी फुरसुंगी येथे पदवीधर नावनोंदणी आढावा बैठक घेतली. पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यांनीही त्यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी मंडल अध्यक्ष धनंजय कामठे,डॉ. बाळासाहेब हरपळे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन हांडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष स्नेहलताई दगडे, कार्यकारिणी सदस्य सचिन हरपळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

दौंड येथे आमदार राहुल कुल यांच्याशी चर्चा

दौंड येथील शासकीय विश्रामगृहात भेगडे यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी पुणे पदवीधर मतदार नोंदणी विषयी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी भाजपा सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडरे,युवा मोर्चाचे श्रीकांत ताम्हाणे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.