Pune : जे झालंय ते अत्यंत किळसवाणं – मनसे अध्यक्ष राज ठाकरे 

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ दोन दिवसापूर्वी घेतली. त्या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायच अशा संभ्रम अवस्थेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, (Pune )कार्यकर्ते आहेत.

NCP : मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, मला कोणीही बाजूला करू शकत नाही – जयंत पाटील

त्याच दरम्यान उद्या शरद पवार आणि अजित पवार यांनी बैठकीच आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण आता नेमक कोणासोबत जायच, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहे.

 

त्या सर्व घडामोडी दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी सध्याच्या राजकीय घडामोडी बाबत विचारले असता. ते म्हणाले की, जे झालंय ते अत्यंत किळसवाणं आहे. जर तुम्ही जनमताचा कानोसा घेतला तर प्रत्येक घरात तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील.दुसरं तुम्हाला काहीही ऐकायला मिळणार नाही. हा मतदारांचा घोर अपमान आहे. यावर मी भाषणात अनेकदा बोललो आहे. या सर्व गोष्टींवर सविस्तर मेळावे घेणार आहे.

 

तसेच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींची सुरुवात शरद पवारांनीच केली.त्यांनी 1978 साली पुलोदचा प्रयोग केला.त्यापूर्वी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं. या सगळ्या गोष्टींची सुरुवात शरद पवारांपासून झाली आणि शेवटही शरद पवारांकडेच झाला आहे.

 

त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ ही माणसं अजित पवारांबरोबर जाणारी माणसं नाहीत. त्यामुळे ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात. संशयास्पद म्हणजे ती तीन माणसं अजित पवारांबरोबर जाऊन मत्रीपदं स्वीकारतील,असं वाटत नसल्याची भूमिका देखील यावेळी त्यांनी मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.