Pune : स्थायी समिती सदस्य पदाची ‘लॉटरी’ कोणाला लागणार?

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची अतिशय महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये नेमकी कोणत्या नगरसेवकांना लॉटरी लागणार याकडे लक्ष लागले आहे. आपलीच या समितीत निवड व्हावी, यासाठी सर्वोपक्षीय नगरसेवकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

भाजपचे 4 सदस्य बाहेर पडत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा आहे. आपणच ‘भाऊ’ तुम्हाला आमदार म्हणूनच निवडून आणण्यासाठी कसे प्रयत्न केले, ते पाठवून दिले जात आहे, महापालिका निवडणुकीला आता 2 वर्षे बाकी आहे. त्यामुळे आता तरी सत्तेचा लाभ हवाच, या भावनेने भाजपचे नगरसेवक प्रयत्न करीत आहेत. या पक्षाचे 2017 च्या महापालिका निवडणुकीत तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते.

खासदार गिरीश बापट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील कोणत्या नगरसेवकांना स्थायी समितीत स्थान मिळणार, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीतर्फेही दोन नगरसेवकांना स्थायी समितीत काम करण्याची संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे. तर, शिवसेना आणि काँगेसचा प्रत्येकी एक सदस्य या समितीत असेल.

या समितीत एकूण 16 सदस्य असतात. यावर्षी 8 सदस्यांचा कालावधी पूर्ण झाल्याने ते बाहेर पडणार आहेत. येत्या 17 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 8 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.