BNR-HDR-TOP-Mobile

Maval : वन्यजीव रक्षक संस्थेने दिले धामण जातीच्या सर्पास व तिच्या 14 अंड्यांना जीवदान

एमपीसी न्यूज – पाण्याच्या टाकीत पडलेल्या धामण जातीच्या सर्पिणीला व तिच्या 14 अंड्यांना मावळ येथील वन्यजीव रक्षक संस्थेने जीवदान दिले. अंड्यातून जन्म घेतलेल्या पिलांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे. 

वन्यजीव रक्षक संस्थेला दिनांक 7 मे रोजी सकाळी 11 वाजता एक धामण सर्प पाण्याच्या टाकीत पडला असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. माहिती मिळताच संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे व सहकारी नयन कदम, निनाद काकडे व सुशांत माने हे घटनास्थळी पोहोचले. त्या सर्पास टाकीतून सुखरूप बाहेर काढल्यानंतर तो जखमी असल्याचे निदर्शनास आले. तिला पुढील उपचार करून काचेच्या पेटीत ठेवण्यात आले असता तिने 10 मे रोजी 14 अंड्यांना जन्म दिला. नंतर सर्पमित्रांनी ती अंडी कृत्रिमरित्या उबावत सुमारे 65 दिवसांनी 14 पिलांना यशस्वी रित्या हॅच केले व मावळ वनविभाग येथे नोंद करून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

HB_POST_END_FTR-A2

.