Women’s Premier League 2023 : महिला आयपीएलचं वेळापत्रक जाहीर! 4 मार्चपासून रंगणार थरार

एमपीसी न्यूज : वीमेन्स प्रीमियर लीगच्या लिलावानंतर या स्पर्धेचं वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर मुंबई आणि गुजरातमध्ये पहिला सामना रंगणार आहे. (Women’s Premier League 2023) या स्पर्धेचा अंतिम सामना बेब्रोन स्टेडिअमवर 26 मार्च रोजी रंगणार आहे. बीसीसीआयनं जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, चार डबल हेडर सामने असणार आहेत. पाच संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 

या वर्षी महिला आयपीएल अर्थात WPL 2023 ला येत्या चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिली लढत गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. चार मार्चापासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. हा अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळवला जाईल.

Shivneri : शिवजयंती निमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

WPL च्या या पहिल्या हंगामात एकूण 20 साखळी सामने खेळवले जातील. त्यानंतर 2 प्लेऑफसामने होतील. या स्पर्धेत एकूण चार दिवस दोन सामने खेळवले जातील. (Women’s Premier League 2023) या चार दिवसांत पहिला सामना दुपारी तीन वाजता खेळवला जणार आहे. तर अन्य सर्व सामने रात्री साडे सात वाजता खेळवले जातील. एलिमिनेटर सामना 24 मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.

दरम्यान, महिला आयपीएलसाठी सोमवारी (14 फेब्रुवारी) लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सर्वाधिक रक्कम मोजली आहे. बंगळुरु संघाने मंधानाला संघात घेण्यासाठी तब्बल तीन कोटी 40 लाख रुपये मोजले आहेत. मंधानाची बेस प्राईज 50 लाख रुपये होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.