Sangavi Crime : नाकाबंदी दरम्यान सांगवी वाहतूक पोलिसांकडून 13 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – सांगवी वाहतूक पोलिसांकडून (Sangavi Crime) नाकाबंदी दरम्यान 13 लाख 87 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलिसांनी आज (बुधवारी) केली. यासाठी 1 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत रक्षक चौक ते पिंपळे सौदागर बीआरटी लेन येथे विषेश मोहीम पोलिसांनी राबवली होती.

या विशेष मोहिमेत पोलिसांनी बीआरटीएसमधून येणारी वाहने, पीटीपी नाकाबंदी, नो एन्ट्री, काळ्या काचेच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या 15 दिवसात बीआरटीएस मार्गामधून येणाऱ्या 950 खासगी वाहनांवर कारवाई करत 6 लाख 36 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

नो एन्ट्रीमध्ये येणाऱ्या वाहनांवर 77 केसेस करत 6 लाख 8 हजार 600 रुपयांचा दंड आकारण्यात आला. काळी काच म्हणजे ब्लॅक फिल्म लावलेल्या 140 वाहनांवर कारवाई करत 1 लाख 49 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर पीटीपी नाकाबंदी दरम्यान 1 हजार 931 वाहनांवर कारवाई करत 13 लाख 87 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

Shivneri : शिवजयंती निमित्त राज्य शासनातर्फे किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

आज बीआरटीएस मधून येणाऱ्या 200 खासगी वाहनांवर कारवाई (Sangavi Crime) करत 1 लाख 39 हजार रुपयांचा दंड आकारला, पीटीपी नाकाबंदीमध्ये 64 वाहनांवर अनपेड दंड आकारत 40 हजार 100 रुपयांचा दंड आकारण्यात आला.

ही कारवाई या पुढेही अशीच सुरु राहील असे सांगवी वाहतूक विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी सांगितेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.