Wakad : भाड्याने दिलेली मोटारसाकल घेऊन कामगार पसार

एमपीसी न्यूज – दोन दिवसांसाठी भाड्‌याने मोटारसाकल घेतली. त्याचे रीतसर भाडे दिले. पण, दिलेल्या मुदतीत तो परत आला नसून पसार झाला. याबाबत एका भाडेकरू विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

श्राम अभिषेक सिंगचौहान (वय 32, रा. बालेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजय माणीक वाझरकर (रा. बालाजीनगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौहान यांचे डांगे चौक येथे दुकान असून ते दुचाकी भाड्याने देतात. त्यानुसार वाझेकर याने त्यांच्याकडून एक दुचाकी (एमएच 12 / क्यू जे 8748) घेतली. वझेकर हा टेल्को कंपनीत कामगार म्हणून कामाला आहे. मात्र, दोन दिवस झाले तरी तो परत आला नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात दुचाकी नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.