World Cup 2023 : विराट कोहलीने नवीन-उल-हकला मिठी मारली

एमपीसी न्यूज – भारत अफगाणिस्थान सामन्यामध्ये (World Cup 2023) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अफगाणिस्थानच्या नवीन-उल-हकला मीठी मारली आणि वादावर पडदा टाकला.

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध लखनऊ सुपर जॉईनट्स यांच्या दरम्यान 1 मे रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली आणि तेज गोलंदाज नवीन उल हक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. सामन्यानंतर आरसीबीचा विराट कोहली, एलएसजीचा नवीन उल-हक आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात वाद झाला.

यानंतर विराटचे चाहते नवीनबद्दल नाराज आहेत. सोशल मिडिया वर मोठ्या प्रमाणात (World Cup 2023) या वादाची चर्चा झाली. आयपीएल नंतर भारत अफगाणिस्थान सामन्यात हे दोघे पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे या दोघांमध्ये आज कोण वरचढ ठरणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी दिल्लीच्या मैदानावर मोठी गर्दी केली होती.

Chinchwad : बँकेने सील केलेल्या घरात अतिक्रमण

पण सामन्या दरम्यान वेगळेच चित्र पाहायला मिळाले. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हकला मिठी मारली.

विराटने प्रेक्षकांना फलंदाजीदरम्यान नवीनला चिडवू नका, असेही सांगितले. वास्तविक, IPL 2023 दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने 1 मे रोजी लखनौच्या एकना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा पराभव केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.