World Update: आशादायक! जगातील 26 टक्के रुग्णांनी केली कोरोनावर मात!

कोरोनाबाधितांची एकूण संख्या 24,81,287 तर कोरोनाच्या बळींची संख्या 1,70,436

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाचे एकूण रुग्ण आणि एकूण मृत्यूचे आकडे दिवसेंदिवस वाढत असले तरी नवीन रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे तसेच कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात चांगली वाढ दिसून येत आहे, ही आशादायक बाब आहे. एका दिवसातील मृतांची संख्या काल काही प्रमाणात वाढली असली तरी एका दिवसात नवीन रुग्णांची संख्या सलग पाचव्या दिवशी घटल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 6 लाख 46 हजार 854 रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत 26 टक्के झाले आहे.

जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 24 लाख 81 हजार 287 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 70 हजार 436 (6.87 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 6 लाख 46 हजार 854 (26 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 16 लाख 63 हजार 997 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 16 लाख 07 हजार 231 (97 टक्के) रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 56 हजार 766 (3 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. सक्रिय रुग्णांमध्ये गंभीर अथवा चिंताजनक रुग्णांचे प्रमाण चार टक्क्यांवरून तीन टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, ही बाबही दिलासादायक आहे. 

जगातील कोरोनावाढीच्या व मृत्यूदराच्या आलेख अनेक चढ-उतार दिसून येत आहे. मात्र सलग गेल्या पाच दिवसांत नवीन कोरोना रुग्णांचा आलेख घसरताना दिसत होते. कोरोनाची साथ आटोक्यात येण्यासाठी सर्वप्रथम नवीन कोरोना रुग्णांची भर पडणे कमी करणे व शेवटी पूर्णपणे थांबविणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याला अजून बरेच दिवस लागणार असले तरी त्या दिशेने पावले पडायला सुरूवात झाली आहे. कोरोना मृतांचा आकडा काल (सोमवारी) थोडा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

14 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 966     दिवसभरातील मृतांची संख्या 10 हजार 761

15 एप्रिल – नवे रुग्ण 84 हजार 515     दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 959

16 एप्रिल – नवे रुग्ण 95 हजार 22       दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 996

17 एप्रिल – नवे रुग्ण 86 हजार 496       दिवसभरातील मृतांची संख्या 8 हजार 672

17 एप्रिल – नवे रुग्ण 81 हजार 930      दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 505

18 एप्रिल – नवे रुग्ण 75 हजार 000     दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 962

19 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 928     दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 366

कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत चीन आठव्या स्थानावरून नवव्या स्थानावर गेला असून इराणने नवव्या स्थानावरून आठवे स्थान मिळविले आहे. स्पेनने काल कोरोनाबाधित रुग्णांचा दोन लाखांचा टप्पा पार केला.

अमेरिकेत कोरोना संसर्ग आठ लाखांच्या उंबरठ्यावर 

एकट्या अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 92 हजार 759 इतकी झाली आहे. मृतांची संख्या देखील 42 हजारांपेक्षा पुढे गेली आहे. अमेरिकेत काल एका दिवसात 1,939 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. स्पेन पाठोपाठ फ्रान्सने देखील मृतांचा 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 16 हजार 500 च्या पुढे गेला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 7,92,759 (+28,123), मृत 42,514 (+1,939)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,00,210 (+1,536), मृत 20,852 (+399)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,81,228 (+2,256), मृत 24,114 (+454)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,55,383 (+2,489), मृत 20,265 (+547)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,47,065 (+1,323), मृत 4,862 (+220)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 1,24,743 (+4,676), मृत 16,509 (+449)
  7. टर्की – कोरोनाबाधित 90,980 (+4,674), मृत 2,140 (+123)
  8. इराण – कोरोनाबाधित 83,505 (+1,294), मृत 5,209 (+91)
  9. चीन – कोरोनाबाधित 82,747 (+12), मृत 4,632 (+0)
  10. रशिया – कोरोनाबाधित 47,121 (+4,268), मृत 405 (+44)
  11. ब्राझील – कोरोनाबाधित 40,743 (+2,089), मृत 2,587 (+125)
  12. बेल्जियम – कोरोनाबाधित 39,983 (+1,487), मृत 5,828 (+145)
  13. कॅनडा – कोरोनाबाधित 36,829 (+1,773), मृत 1,690 (+103) 
  14. नेदरलँड – कोरोनाबाधित 33,405 (+750) , मृत 3,751 (+67)
  15. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 27,944 (+204), मृत 1,429 (+36)
  16. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 20,863 (+657), मृत 735 (+21)
  17.  भारत – कोरोनाबाधित 18,539 (+924) , मृत 592 (+33)
  18. पेरू –  कोरोनाबाधित 16,325 (+697) , मृत 445 (+45)   
  19. आयर्लंडकोरोनाबाधित 15,652 (+401) , मृत 687 (+77)
  20. ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 14,795 (+46), मृत 470 (+18)       

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.