World Update: कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14 लाख 30 हजार 919 तर बळींची संख्या 82 हजार 34!

जगात एका दिवसात मृतांचा आकडा 7 हजार 380

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची संख्या कालच्या (मंगळवार) एका दिवसात 84 हजार 915 ने वाढल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 14 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एक लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या अमेरिका, स्पेन, इटली व जर्मनी या चार देशांच्या पाठोपाठ फ्रान्स देखील एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. आज (बुधवार) सकाळपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 लाख 30 हजार 919 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 7 हजार 380 वाढून 82 हजार 34 झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 01 हजार 905 इतकी झाली, ही बाब थोडा दिलासा देणारी आहे. जगभरात अजून 10 लाख 46 हजार 980 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 47 हजार 913 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. 

स्पेनमध्ये 13 हजार 341 बळी 

स्पेनने इटलीला मागे टाकत कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसरा क्रमांक मिळवला आहे. स्पेनमध्ये एकूण 1 लाख 41 हजार 942 कोरोनाबाधित असून आतापर्यंत 14 हजार 045 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये काल (मंगळवारी) 704 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 5 हजार 267 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

इटलीत 17 हजार 127 बळी

इटलीत एकूण 1 लाख 35 हजार 861 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इटलीत मृतांचा एकूण आकडा 17 हजार 127 पर्यंत वाढला आहे. इटलीमध्ये गेल्या 24 तासांत एकूण 604 बळी गेले आहेत. या देशांत काल दिवसभरात कोरोनाचे 3  हजार 39 नवे रुग्ण आढळून आले.

फ्रान्समध्ये मृत्यूचे तांडव

अमेरिका, इटली, स्पेन व जर्मनी पाठोपाठ फ्रान्सही आता कोरोनाबाधित रुग्णांचा एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एक लाखपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला हा जगातील पाचवा देश ठरला आहे. फ्रान्समध्ये 1 लाख 09 हजार 069 कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत एकूण 10 हजार 328 बळी गेले आहेत. कोरोनाबाधित मृतांचा 10 हजारचा टप्पा ओलांडणारा फ्रान्स हा चौथा देश ठरला आहे. फ्रान्समध्ये एक दिवसात 1 हजार 417 बळी गेले असून कोरोनाचे तब्बल नवीन 11 हजार 059 रुग्ण सापडले आहेत.

जर्मनीतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 7 हजार 663 झाला आहे. जर्मनीत आतापर्यंत 2 हजार 016 कोरोनाबाधित मृत्युमुखी पडले आहेत. एका दिवसात जर्मनीत 206 बळी गेले असून 4 हजार 288 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.  

ब्रिटनमध्ये एका दिवसात 786 बळी

इंग्लंडमध्ये काल दिवसभरात 786 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नवीन 3 हजार 634 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये एकूण रुग्णसंख्या 55 हजार 242 तर मृतांची संख्या 6 हजार 159 झाली आहे.   

चीनमधील परिस्थिती आता नियंत्रणाखाली

चीनने कोरोनाचा प्रसार व बळींची संख्या दोन्हींवर नियंत्रण मिळविले असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरोनाची लागण सुरू झाली त्या चीनमध्ये आतापर्यंत एकूण 81 हजार 740 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिवसभरात केवळ 32 नवे रुग्ण आढळले तर सलग दुसऱ्या दिवशी एकही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही, ही मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे. आतापर्यंत 3 हजार 331 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झालेल्या इतर देशांमधील कोरोनाबाधिताची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचे आकडे दिले आहेत.

इराण – 62,589 (3,872) 

टर्की – 34,109 (725)

स्वित्झर्लंड  -22,253 (821)

बेल्जियम – 22,194 (2,035)  

नेदरलँड – 19,580 (2,101) 

कॅनडा – 17,897 (381) 

ऑस्ट्रीया – 12,639 (243)

ब्राझील – 14,034 (686)

पोर्तुगाल – 12,440 (345) 

दक्षिण कोरिया – 10,331 (192)

इस्राईल – 9,248 (65) 

स्वीडन – 7,693 (591) 

रशिया – 7,497 (58)

ऑस्ट्रेलिया – 5,988 (49)

नॉर्वे – 6,086 (89)

आयर्लंड – 5,709 (210)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.