Dehuroad News : शाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या वतीने संतोष भोसले यांना युवा उद्योजक पुरस्कार

एमपीसी न्यूज – देहूरोड किवळे येथील शाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या वतीने ह्या वर्षीचा ‘युवा उद्योजक पुरस्कार’ बांधकाम उद्योजक संतोष भोसले यांना प्राप्त झाला. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त दि.15 रोजी सायं.6 वाजता धनश्री हॉटेल, विकासनगर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.

बांधकाम क्षेत्रामध्ये केलेली प्रगती व कुठलाही पूर्वानुभव नसताना केलेली उल्लेखनीय कामगिरी ह्याच्या जोरावर या वर्षीचा युवा उद्योजक पुरस्कार संतोष भोसले यांना देण्यात आनंद होत आहे, असे मत शाहू फुले आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी यावेळी व्यक्त केले.

मावळातील युवा तरुण विविधक्षेत्रामध्ये जिद्ध, चिकाटी व मेहनतीने नावलौकिक करत आहेत व त्यांना पाठबळ देण्याचं काम आमच्या विचारमंचाच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती आयोजक धर्मपाल तंतरपाळे व सिंधू तंतरपाळे यांनी दिली.

यावेळी क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिम्मित महाराष्ट्राची शौर्यगाथा व सन्मान महापुरुषांचा संगीत रजनी हा सांस्कृतिक व भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रम प्रसंगी रोहित माळी, राजेंद्र तरस,शाम भोसले, विशाल तरस, विजय मोरे,पंकजतंतरपाळे,किरण कांबळे,बापू कातळे, प्रसाद तरस,शुभम तरस,धीरजबाबर,विनोद लोंढे,राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.