Pimpri News : माहिती अधिकार महासंघाच्या पिंपरी-चिंचवड मुख्य संघटकपदी प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची माहिती अधिकार महासंघाच्या सदस्य पदी निवड झाली आहे तसेच त्यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्राच्या मुख्य संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाकडून त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मुंबई येथील कार्यालयात महासंघाची बैठक झाली. या बैठकीत प्रदीप नाईक यांच्या सभासद नोंदणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कार्यकर्ता महासंघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी निवड समितीच्या शिफारशीनुसार बैठकीत चर्चा करून सर्वानुमते प्रदीप नाईक यांना सदस्यत्व देत त्यांना पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्राच्या मुख्य संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 हा जनसामान्यांचा कायदा आहे. या कायद्याचा वापर करून प्रशासन पारदर्शी, लोकाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने महासंघ काम करत आहे. नागरिक अधिकारांच्या संबंधी प्रचार करणे आणि संलग्न समाजसेवी उपक्रम राबवाल असा विश्वास देखील माहिती अधिकार महासंघाने प्रदीप नाईक यांच्याबाबत व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.