Chinchwad: तरुण पिढीला अध्यात्मिक ज्ञानाची गोडी लागावी – आर. के. पद्मनाभन

मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवास उत्साहात सुरुवात

एमपीसी न्यूज – आत्ताची तरुण पिढी काहीशी भरकटत चालली आहे. त्या तरुणाईला योग्य मार्ग दाखवायला हवा. तसेच त्यांना अध्यात्मिक ज्ञानाची गोडी लागायला हवी. त्यामुळे संस्कृतीचा विकास होईल, असे मत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केले.

महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या 457 वा संजीवन समाधी महोत्सवास सोमवारी (दि. 17) सुरुवात झाली. महोत्सवाचे उदघाटन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते झाले. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी आयुक्त ते बोलत होते. यावेळी मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. विकास ढगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, विश्वस्त विनोद पवार, अॅड. राजेंद्र उमाप, आनंद तांबे, विठ्ठल भोईर, विघ्नहरी देव महाराज, विश्राम देव,  नगरसेविका करुणा चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “माझी आजवर सर्वात जास्त पोलीस सेवा तीर्थक्षेत्र असलेल्या शहरात झाली. तीर्थक्षेत्र असलेल्या शहरात काम करताना संस्कृती आणि अध्यात्माचे वातावरण असलेले जाणवते. त्यातून मलाही काही प्रमाणात अध्यात्माची गोडी लागली आहे. आताही पिंपरी चिंचवड शहराचा पहिला पोलीस आयुक्त म्हणून मोरया गोसावी नगरीची सेवा करताना आनंद होत आहे.

आपण प्रत्येकजण आपल्या समाजाला अध्यात्मिक देणे लागतो. तो वसा मोरया गोसावी देवस्थान समर्थपणे पार पाडत आहेत, असे हेमलता काळोखे म्हणाल्या. उपस्थितांच्या हस्ते 2019 च्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक विश्राम देव यांनी केले. आभार आनंद तांबे यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.