Alandi : भाजी मार्केटमध्ये पावती फाडल्यावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – भाजी मार्केटमध्ये पावती फाडल्याच्या कारणावरून तरुणाला चार जणांनी मिळून हाताने व कोयत्याने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 5) रात्री साडेसातच्या सुमारास आळंदी येथील खंडोबा मंदिराजवळ घडली.

वैभव दामोदर पोटे (वय 18 रा. आळंदी), असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन माने, ओंकार गाडेकर, ऋषी गडकर, नारायण घुगे (सर्व रा. देहूफाटा आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आळंदी भाजी मार्केट येथे पावती फाडण्याचे काम करतात. ते गुरुवारी स्वतःच्या घराजवळ बसले असताना आरोपी नितीन तेथे आला. त्याने ‘माझ्या आईची पावती फाडयची नाही’ असे म्हणत भांडण करण्यास सुरुवात केली. यावेळी नितीन व त्याच्या साथीदारांनी वैभवला कोयत्याने व हाताने मारहाण केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.