Pimpri : विषारी क्षार पाण्यात मिसळल्याने कर्करोग रुग्णांच्या संख्येत वाढ

कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या उपाययोजना करीत आहे; खासदार श्रीरंग बारणे यांचा संसदेत तारांकित प्रश्न

एमपीसी न्यूज – विषारी क्षार पाण्यात मिसळल्यामुळे पाणवठे देखील विषारी होत आहेत. या पाणवठण्यांवरून पिले जाणारे पाणी मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहे. यामुळे कर्करोगाची लागत होत आहे. देशभरात असे विषारी पाणी पिल्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याबाबत केंद्र सरकार कोणत्या उपाययोजना करीत आहे, असा तारांकित प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी आज, शुक्रवारी (दि. ६) संसदेत विचारला. त्यांच्या प्रश्नाला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी उत्तर दिले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “दिवसेंदिवस वाढत असलेले प्रदूषण, यामुळे वाढणारे जागतिक तापमान ही मानवासाठी धोक्याची घंटा आहे. त्यात भर म्हणून विषारी घटक पाण्यात मिसळल्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे. जमिनीत मोठ्या प्रमाणात विषारी वायू सोडले जातात. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे विहिरी, तलाव आणि नद्या असे सर्व पाणवठे प्रदूषित होत आहेत. रसायनमिश्रित पाणी मानवी शरीरासाठी घातक ठरत आहे.

प्रदूषित पाणी पिल्यामुळे देशभरात कर्करोगाची लागण होणा-या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कर्करोगमुक्तीचा लढा आपल्याला लढावा लागणार आहे. त्यासाठी विविध स्तरावरून उपाययोजना व्हायला हव्यात. पाणवठे प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन कोणत्या उपाय योजना करीत आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी विचारले.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रश्नाला आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी उत्तर दिले. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ देशभरात चार हजार ठिकाणी पाण्याच्या चाचण्या घेत आहे. या चाचण्यांमधून विविध विषारी रसायनांची तपासणी केली जात आहे. कर्करोग होण्याची विविध कारणे आहेत. कर्करोगाचे विष कुठल्याही माध्यमातून येत असले, तरी ते मानवी आरोग्यासाठी घातक आहे. विज्ञानाला सोबत घेऊन समाजात जनजागृती करून ही लढाई लढावी लागणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.