Chinchwad : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सह आयुक्त डाॅ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांची बदली

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या(Chinchwad) पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस अधिका-यांच्या बुधवारी (दि. 31) बदल्या झाल्या. यात पिंपरी- चिंचवडचे पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे आणि पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांची बदली झाली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड दलातील 27 पोलीस (Chinchwad)निरीक्षकांच्या मंगळवारी बदल्या झाल्या. त्यापाठोपाठ बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

Pune : राष्ट्रवादीचा कसबा विधानसभा मतदारसंघात पदनियुक्ती सोहळा

यात पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली. पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांची नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधीक्षकपदी बदली झाली.

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांची पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपायुक्तपदी बदली झाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.