Dehuroad : मुस्लिम समाजाच्या अडीअडचणींना धावून येणार- पार्थ पवार

एमपीसी न्यूज – मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त पार्थदादा पवार युवा मंच आयोजित रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पडली.

देहूरोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयात आज (सोमवारी) सायंकाळी सहा वाजता इफ्तार पार्टी झाली. यावेळी पार्थ अजित पवार, पार्थदादा पवार युवा मंचचे अध्यक्ष अशपाक शेख, तळेगावचे नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष ऍड.कृष्णा दाभोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रवीण झेंडे, देहूरोड महिला शहराध्यक्ष शीतल हगवणे, अल्पसंख्याक अध्यक्ष शंकर स्वामी, सामाजिक कार्यकर्ते अमीन शेख, अक्षय वाघमारे यांच्यासह देहूरोड मधील सर्व नागरिक उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

यावेळी बोलताना पार्थ पवार म्हणाले, ”सामाजिक एकोपा व सलोखा जपण्यासाठी यांसारख्या उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. मुस्लिम समाज नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ द्या. तुमच्या अडीअडचणीला मी धावून येईन ”

कार्यक्रमाच्या संयोजनात पार्थदादा पवार युवा मंचचे सर्व पदाधिकारी व देहूरोड शहर मुस्लिम महासंघाच्या सर्व पदाधिका-यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.