Mumbai : सरकारी बाबू समझो इशारे… आधे घंटे में खाना खा रे !

एमपीसी न्यूज- आता कोणत्याही वेळी शासकीय कार्यालयात गेल्यानंतर तुमच्या कानावर ‘साहेब जेवायला गेले आहेत’ ही सबब कानावर पडणार नाही. राज्य शासनाने आदेश काढून लंचटाइमची वेळ आता फक्त अर्धातास केली आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोन अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र अर्ध्यातासातच जेवण आटोपून कर्मचाऱ्यांनाआपल्या कामाच्या ठिकाणी हजर राहावे लागणार आहे. या आदेशामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना जोरदार दणका मिळाला आहे.

18 सप्टेंबर 2001 च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दुपारी एक ते दोन या वेळेत जास्तीत जास्त अर्ध्या तासाची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. पण मंत्रालयाव्यतिरिक्त इतर राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाची वेळ निश्चित नव्हती. या आदेशांव्ये आता जेवणाची वेळ 1 ते 2 असली तरीही सर्व कर्मचाऱ्यांना अर्ध्यातासातच जेवण आटोपावी लागणार आहे.

त्यामुळे जेवण उरकून कार्यालयात इतरत्र भटकून कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने दणका दिला आहे. खात्‍यातील सर्वच जणांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्‍यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणत्‍याही वेळी ‘साहेब जेवायला गेले आहेत’ ही सबब कानावर पडणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.