Pune : युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल मधील संस्कृती त्रिमुखे दहावीमध्ये प्रथम

एमपीसी न्यूज- ईगल एज्युकेशन सोसायटी संचालित कात्रज कोंढवा रोडवरील युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्यु. कॅालेज मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. संस्कृती त्रिमुखे हिने 93.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. सूरज शिर्के याने 90.40 टक्क्यांसह दुसरा; तर निकिता जांगीड हिने 90 टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला.

संस्कृती त्रिमुखे आणि निकिता जांगीड या दोन्ही विद्यार्थिनींनी गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले. शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये एकूण 71 विदयार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 28 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले .या यशस्वी विद्यार्थ्यांचे ईगल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.ए. मुलाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री जाधव, उपमुख्याध्यापिका सुनीता चांदगुडे, सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.