Pune : भारतीय विद्या भवनतर्फे शुक्रवारी गायन सतार सहवादन

एमपीसी न्यूज- भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गायन सतार या सहवादनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 28) भारतीय विद्या भवन येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

उस्ताद शाहिद परवेझ यांचे शिष्य आणि सतारवादक समीप कुलकर्णी हे सतारवादन सादर करणार आहेत. सौरभ काडगावकर हे गायन करणार आहेत . तबल्यावर अरविंद परांजपे, हार्मोनियमवर सुखदा खरे साथसंगत करणार असून स्नेहा रानडे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम असून सर्वांसाठी खुला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.