Nigdi : निगडी येथील घरातून साडेसोळा किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – निगडी मधील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी येथून एका घरातून 16 किलो 450 ग्रॅम वजनाचा तीन लाख 45 हजार 450 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 27) सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली.

मंटू चंद्रभूषण पासवान (वय 46, रा. आझाद चौक, निगडी. मूळ रा. बिहार) याला याप्रकरणी अटक केली आहे. याच्यासोबत सोनाबाई पवार (रा. सिद्धार्थ नगर झोपडपट्टी, ओटास्कीम निगडी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाबाई पवार या महिलेच्या घरात मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोनाबाई पवार यांच्या घरावर छापा मारून 16 किलो 450 ग्रॅम वजनाचा तीन लाख 45 हजार 450 रुपये किमतीचा गांजा जप्त केला. यामध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून एका महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.