Pimpri : मतदार यादीतील स्थलांतरित, दुबार, मयत, बोगस नावे वगळण्याची मागणी

एमपीसी न्यूज – राज्यातील मतदार यादीतील स्थलांतरित, दुबार, मयत, बोगस नावे वगळण्यात यावीत. राज्यातील मतदार यादी अद्यायवत करण्याची मागणी पिंपरी महापालिकेचे भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिका-यांना पत्र पाठविले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, राज्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्यात याव्यात. बोगस मतदान टाळण्यासाठी दुबार नावे वगळण्यात यावीत. स्थलांतरित, दुबार आणि मयत मतदारांची नावे स्वत:हून कमी करण्याची विनंती नागरिकांना केली गेली पाहिजे. त्यामुळे लोकसभा निवडणुकित वापरण्यात आलेल्या मतदार यादीबरोबरच नव्याने नावनोंदणी केलेल्या मतदारांच्या पुरवणी यादीत नाव असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

तसेच मतदार यादी अद्यायवत होण्यास मदत होणार आहे. परंतु असे असतानाही बोगस मतदान होऊ नये म्हणून आयोगाने केंद्रस्तरीय अधिका-यांच्या मदतीने घरोघरी जाऊन याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचे काम जलद गतीने करावे. मतदार यादीतील स्थलांतरित, दुबार मयत आणि बोगस नावे वगळून महाराष्ट्र राज्याची अद्ययावत मतदार यादी करण्याची विनंती वाघेरे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.