Chinchwad : प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 200 लिंब रोपांचे केले वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हरीतवारी उपक्रमाअंतर्गत तळेगाव परिसरातील पार्श्वप्रज्ञान्य शाळेच्या आवारात 200 लिंब झाडाच्या रोपांचे रोपण केले.

कमला शिक्षण संकूलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी बैठक घेण्यात आली. त्यांनी आवाहनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील इतर शाखेतील विद्यार्थ्यांनी तळेगाव परिसरात सामाजिक बांधिलकी जपून वृक्षारोपण केले. वृक्षारोपणाचे महत्त्व आदींबाबत सुमारे 85 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  • शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद जाधव यांच्या हस्ते वृक्षाचे पूजन करून वृक्षारोपणास सुरूवात केली. त्यांच्यासमवेत प्रतिभा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अरविंद बोरगे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. नंव्व्या डंडवानी, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद लूंकड इतर प्राध्यापकांसमवेत विद्यार्थी प्रतिनिधी आकाश बंन्सल, ऐश्वर्या शिंदे आदी 85 विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणास हातभार लावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.