Wakad : पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरल्या

एमपीसी न्यूज – कंपनी आणि महाविद्यालयाच्या बाहेर पार्क करून ठेवलेल्या 55 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या तीन घटना शहरात घडल्या. याप्रकरणी भोसरी, वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अक्षय वसंत पाटील (वय 29, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी मधील ऍनाफिनॉल कंपनीसमोर अक्षय यांनी त्यांची दुचाकी (एम एच 19 / सी एम 9185) पार्क करून ठेवली होती. भर दिवसा अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

गणेश ज्ञानेश्वर पाटील (वय 30, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांनी त्यांची मोटारसायकल (एम एच 12 / एच एम 5233) हिंजवडी फेज तीन येथील फिल्टरम पॉलिमर्स या कंपनीच्या बाहेर पार्क केली होती. भर दिवसा अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या घटनेत सूरज अनिल टेकाळे (वय 45, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सूरज यांची हिरो होंडा पॅशन मोटारसायकल (एम एच 14 / यु 1491) ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने गाडीचे लॉक तोडून गाडी चोरून नेली. दुपारी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.