Sandip Waghere : सरळ सेवेतील रिक्त पदे तत्काळ भरा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास 26 लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे. यामुळे महापालिकेतील सरळ सेवेतील रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे (Sandip Waghere) यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी -चिंचवड महापालिका ही एक स्वायत्त संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या मर्यादित आहे. महापालिकेचा यापूर्वीच “ब” वर्गात समावेश झालेला असून या आकृती बंधानुसार कर्मचारी संख्या देखील वाढलेली आहे. मागील तीन ते चार वर्षामध्ये सुमारे 1 हजार पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी निवृत्त झालेले आहेत.

Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ‘हे’ आमदार असण्याची शक्यता; तर रायगड शिवसेनेच्या हातून जाईल का?

त्या पदांवर सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात आलेली नाही. आरोग्य विभागामध्ये जवळपास 700 ते 800 सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने पर्यायाने खाजगी संस्थाना महापालिकेच्या वतीने काम देऊन करोडो रुपयांची उधळपट्टी होत आहे. तसेच खाजगी संस्थांमार्फत भारती करताना अनेक गैरप्रकार घडत असून याबाबतीत अनेक गैरप्रकार उघडकीस येऊन महापालिकेला नाहक बदनामी सहन करावी लागत आहे.

Shivsena Leader Eknath Shinde : रिक्षाचालक ते कॅबिनेट मंत्री व्हाया शाखाप्रमुख; एकनाथ शिंदेंचा संपूर्ण राजकीय प्रवास

अशा संस्थाना काम देण्याऐवजी महापालिकेमार्फत सरळसेवेतील रिक्त पदे भरल्यास प्रशासनाचा देखील ताण कमी होऊन शहरातील नागरिकांना अत्यावश्यक नागरी सुविधा देणे सोयीचे होणार आहे तसेच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये यापूर्वी विविध विकास कामांकरिता एमआयडीसी व लष्कर हद्दीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या हजारो एकर जमिनी गेल्या आहेत.त्यामुळे महापालिकेतील रिक्त पदे व सरळ सेवेतील पदे भरताना स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे. अशी आगृही मागणी वाघेरे (Sandip Waghere) यांनी आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.