Pimpri News: जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरु होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील कै. दत्तोबा वाघेरे जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील कै. दत्तोबा वाघेरे जलतरण तलाव सुरु करण्यसाठी ग क्षेत्रीय कार्यलयाचे क्रीडा पर्यवेक्षकांसोबत 11 मार्च रोजी तलावाची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार स्थापत्य व विद्युत विभागास संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

तलावातील पाणी स्वच्छ करण्याचे काम क्रीडा विभागामार्फत हाती घेण्यात आले असून पुढील आठवड्यात जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.