Akurdi Crime News : कामावरून घरी परतताना इसमाचा हिसकावला 52 हजार रुपयांचा ऐवज

एमपीसी न्यूज – कामावरून घरी परतत असताना इसमाचा 52 हजार रुपयांचा ऐवज हिसकावला. यामध्ये 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, पाच हजार रूपयांचा नोटा, लेदर पाकीट, एटीएम कार्ड, लायसन्स, आधारकार्ड असा यांचा समावेश आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणा-या लिंकरोड, आकुर्डी येथे गुरूवारी (दि.07) ही घटना घडली.

सागर दामाजी वाघमारे (वय 36, रा. एसबी पाटील शाळेमागे, रावेत) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चार अनोळखी इसमाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर हे कामावरून घरी जात होते. लिंकरोड, आकुर्डी येथे आल्यावर चार आरोपी इसमांनी अडवणूक करून मारहाण केली. फिर्यादी यांचा 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन, पाच हजार रूपयांचा नोटा, लेदर पाकीट, एटीएम कार्ड, लायसन्स, आधार कार्ड असा एकूण 52 हजार रूपयांचा ऐवज हिसकावला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.