Talegaon dabhade : आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पुरग्रस्तांसाठी एक लाख रुपयाचा धनादेश

एमपीसी न्यूज – आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने एक लाख रुपयाचा धनादेश पूरग्रस्त निधी म्हणून  माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे हस्ते शासकीय पूरग्रस्त समन्वयक अधिकारी मनोज दिघे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचा वाढदिवस पतसंस्थेकडून अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.

यावेळी महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर या शहरावर आलेले पुराचे भयंकर संकट पाहून संस्थेचे संस्थापक बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ संचालक व विद्यमान नगरसेवक किशोर भेगडे यांनी कृष्णराव भेगडे यांचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करून पूरग्रस्तांना मदत करण्याचा मानस संचालक समिती समोर ठेवला. त्यास सर्वांनी मंजुरी दिली.

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी (दि.10 ऑगस्ट) संस्थेच्या कार्यालयात सदर एक लाख रुपयाचा धनादेश पूरग्रस्त निधी म्हणून पूरग्रस्त समन्वयक अधिकारी मनोज दिघे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी उद्योजक राजेश म्हस्के, संस्थेचे चेअरमन दीपक जाधव, सचिव संदेश जाधव, व खजिनदार सौ राजश्री म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like